लंडनमधील अटकेमुळे विजय मल्ल्याला फायदाच झाला

0

नवी दिल्ली : मंगळवारी लंडनमध्ये फ़रारी विजय मल्ल्याला अटक झाल्याने भारतात राजकीय गदारोळ सुरू झाला. लवकरच त्याला भारतात आणले जाईल असे म्हटले जात असले तरी त्याचाच फ़ायदा त्यातून झाला आहे. कारण आता त्याच्यावरील आरोपाची आधी ब्रिटीश कोर्टात सुनावणी करावी लागेल आणि त्यात हवा तितका कालापव्यय करण्याची संधी त्याला मिळणार आहे. दोन देशात गुन्हेगार देवाणघेवाणीचा करार असला तरी त्याच्या मदतीने अजून कोणालाही भारतात आणणे शक्य झालेले नाही. म्हणूनच मल्ल्या निश्‍चींत असल्याचे जाणकार सांगतात.

थेट राजकीय व प्रशासकीय पातळीवर अशी कारवाई झाली असती, तर मल्ल्याला लौकर मायदेशी आणता आले असते. पण भारतातील गुन्ह्यासाठी ब्रिटनमध्ये कायद्याची लढाई करण्याचा डाव मल्ल्याला लाभाचा होता. पण परस्पर कोर्टात जाण्यापेक्षा भारत सरकारने काही करावे, अशीच त्याची अपेक्षा होती. जेणेकरून ब्रिटीश न्यायालयाचा हा विषय व्हावा असाच मल्ल्याचा डाव होता. म्हणूनच मंगळवारच्या अटकेने तो खुश आहे.

आता त्याच्यावरील गुन्हेगारी आरोपाचे गांभिर्य मुळात ब्रिटीश कोर्टाला पटवावे लागेल. ते सोपे काम नाही तितकेच लौकर उरकणारे काम नाही. त्यात अधिकाधिक कालापव्यय करण्याची खेळी मल्ल्या खेळू शकतो. किंबहूना म्हणूनच इतके दिवस तो भारत सरकारने कायदेशीर बडगा उगारण्याची प्रतिक्षा करत होता, असेही काही जाणत्यांचे मत आहे.