लंडन-फिन्सबरी पार्क दुर्घटना

0

नवी दिल्ली : ब्रिटनची राजधानी लंडन येथील एका मशिदीच्या बाहेर एका वाहनाने अनेक पादचार्‍यांना चिरडले. या घटनेत अनेक जण जखमी झाले. यात एकाचा मृत्यू झाला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास फिन्सबरी पार्क येथील एका मशिदीतून नमाज पठण करून मोठ्याप्रमाणात लोक बाहेर पडले. त्यावेळी ही घटना घडली.

दरम्यान प्रत्यक्षदर्शीने जाणूनबुजून मुस्लिमांना लक्ष्य केल्याचे सांगितले आहे. परंतु, पोलिसांनी याला दुजोरा दिलेला नाही. ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवली आहे. त्यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. सध्या रमजानचा महिना सुरू आहे. यापूर्वी 3 जून रोजी 3 हल्लेखोरांनी लंडनमध्ये दोन जागांवर हल्ले केले होते.
मेट्रोपोलिटन मेजिस्ट्रेटने ही मोठी घटना असल्याचे म्हटले आहे. ज्या व्यक्तीने हे कृत्य केले. त्याला अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दहशतवादविरोधी पथकाकडून या घटनेचा तपास केला जात आहे. एका प्रत्यक्षदर्शीने या दुर्घटनेत किमान 10 लोक जखमी झाले आहेत.