लक्ष्मण जगताप गुरूवारी उमेदवारी अर्ज भरणार..!

0

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांना चिंचवड विधानसभा मतदारसंघातून पक्षाची उमेदवारी जाहीर झाली आहे. गुरूवारी (दि.3) रोजी प्राधिकरणातील निवडणूक कार्यालयात लक्ष्मण जगताप त्यांचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत. अर्ज भरण्याच्या निमित्ताने रॅली काढत त्यांच्याकडून जोरदार शक्तीप्रदर्शन देखील करण्यात येणार आहे.
भाजपकडून आज उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीयं. त्यात चिंचवडमधून लक्ष्मण जगताप यांच्यावर पक्षाने विश्‍वास दाखवत पुन्हा उमेदवारी दिली आहे. उमेदवारीची घोषणा होताच त्यांच्या समर्थकांकडून जल्लोष करण्यात आला. पेढे भरवून आनंद व्यक्त करण्यात आला. गुरूवारी दि.3 रोजी ते आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. सकाळी 9 वाजता पिंपळेगुरव येथील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात दर्शन घेऊन रॅलीची सुरवात होणार आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघात यानिमित्ताने जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहेत. त्यानंतर प्राधिकरण येथील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे ते उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत.