लखनऊ : उत्तर प्रदेशात शेवटच्या टप्प्याचे मतदान सुरू असताना लखनऊमध्ये सुरू झालेल्या व बारा तास चाललेल्या चकमकीत एका घरात लपलेल्या अतिरेक्याला ठार मारण्यात अखेर यश आले. ठाकुरगंज येथील घरात पहाटे तीन वाजता एटीएसच्या पथकाने या अतिरेक्याचा खात्मा केला. एकापेक्षा जास्त अतिरेकी असावेत असा प्राथमिक अंदाज होता, परंतू एकच अतिरेकी मिळून आला. ठार मारण्यात आलेल्या अतिरेक्याचे नाव सैफुला आहे. तो आयएसआयएसशी संबंधीत आहे. ज्या ठिकाणी तो लपून बसला होता तेथून मोठ्याप्रमाणात स्फोटकं तसेच बॉम्ब बनिविण्याचे साहित्य, आठ पिस्तूल आणि चाकू, भारतीय चलन, मोबाईल फोनसह आयएसआयएसचा झेंडाही मिळाला आहे.
रेल्वेचे वेळापत्रकही सापडले
मंगळवारी चकमक दुपारी साडेतीन वाजता सुरू झाली. सुरवातीला दोन अतिरेकी आहेत असे वृत्त होते. चकमक पहाटे साडेतीननंतर थांबली. अतिरेक्याला जीवंत पकडण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू होता. एटीएसचे वरिष्ठ आधिकारी असीम अरूण यांनी सांगितले की, आम्ही अतिरेक्याला बाहेर काढण्यासाठी मिर्चीबॉम्बचाही वापर केला परंतू त्याचा उपयोग झाला नाही. अतिरेक्याच्या मृतदेहाशेजारी 8 पिस्तूल, 650 काडतूस, स्फोटकं, सोने, रोख रक्कम, पासपोर्ट, सीमकार्ड, भारतीय रेल्वेच वेळापत्रक सापडले. मारण्यात आलेला अतिरेकी ईसिसशी संबंधीत होता व तोखुरसान टोळीचा सक्रिय सदस्य होता.
रेल्वेतील स्फोटाशी संबंध
पोलिसांचे म्हणणे आहे की, ठार मारण्यात आलेला अतिरेकी सैफुला याचा मंगळवारी भोपाळ-उज्जैन पॅसेंजर रेल्वेत झालेल्या बॉम्बस्फोटाशी संबंध असावा, अशी पोलिसांना शंका आहे. या अपघातात 12 प्रवाशी जखमी झाले होते. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी या रेल्वे स्फोटातील संशीयीताचा तपासही केला होत. ज्यापैकी दोघांना कानपूर तर एकाला इटावा येथून अटक करण्यात आली आहे. तसेच तीनजणांना मध्य प्रदेशातून ताब्यात घेण्यात आले आहे.