लग्नसमारंभावरील वाढता खर्च विधायक कामात लावा

0

भुसावळ । मराठा समाजातील सुशिक्षित तरुण तरुणींची वधुवर सुची तयार करण्यात येत असून अद्ययावत सुची असल्यास त्याचा फायदा समाजातील सर्व गरुजूंना होऊ शकतो. सुचीद्वारे आपण सामुदायिक विवाहाचे आयोजन करुन सामाजिक एकोपा वाढवू शकतो. तसेच लग्न समारंभावर वाढता खर्च कमी करुन हा खर्च विधायक कामांसाठी करण्याची आवश्यकता असून खर्चिक लग्न टाळून बचत करण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चाचे अध्यक्ष महेंद्र पाटील यांनी केले.

समाजाने संघटीत होण्याची गरज
मराठा मंगल विवाह व प्रबोधन स्वयंसेवी संस्था जळगाव व मराठा क्रांती मोर्चातर्फे बाजारपेठ पोलीस स्थानकाच्या बाजूला नावनोंदणी शिबीर घेण्यात आले. उद्घाटन महेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. ते पुढे म्हणाले की, मराठा समाजाचची संख्या 35 टक्के पेक्षा जास्त आहे. परंतु समाज संघटीत नाही त्यामुळे अनेक तोटे समोर येतात. शासनाच्या काही योजना आहेेत पण त्याचा फायदा समाजातील लोकांना मिळत नाही. याबाबत त्यांना माहितीच नसते याबाबत समाज बांधवांना मार्गदर्शन केल्यास ते देखील या योजनांचा सहजपणे लाभ घेवू शकतील त्यासाठी समाजाने संघटीत व्हावे असे आवाहन अध्यक्ष महेंद्र पाटील यानंीं केले. याप्रसंगी संचालक आर.जी. पाटील, व्ही.बी. पाटील, अ‍ॅड. तुषार पाटील, संजय कदम, नरेश पाटील, अशोक हंगणे, कृष्णा शिंदे, राजेंद्र आवटे, ललीत मराठे, हितेश टकले, किशोर शिंदे, गौरव आवटे उपस्थित होते.