मेडीकल टाकण्यासाठी माहेरुन 10 लाख रुपये आणावे यासाठी विवाहितेचा छळ ः अमळनेर येथील डॉक्टरपतीसह सासर्यांविरोधात रामानंदनगर पोलिसात गुन्हा
जळगाव – अमळनेर येथील सासर व शहरातील व्यंकटेश नगर येथील माहेर असलेल्या विवाहितेला मेडीकल टाकण्यासाठी माहेरच्यांकडून 10 लाख रुपयांची मागणी करुन ते न दिल्याने वारंवार शारिरीक व मानसिक छळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली जात होती. दरम्यान विवाहतेच्या तक्रारीवरुन डॉक्टर पती, सासू, सासरे व दीर या चार जणांविरोधात शनिवारी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे 7 रोजी लग्नाचा चौथा वाढदिवस अन् दुसर्या दिवशी विवाहितेवर पतीविरोधात गुन्हा दाखल करण्याची वेळ आली.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की शहरातील रामानंदनगर परिसरातील व्यंकटेशनगर येथील माहेर असलेल्या दिपाली श्रावण महाजन यांचा 7 डिसेंबर 2014 रोजी अमळनेर शहरातील माळीवाडा येथील डॉक्टर गोविंदा भिका महाजन यांच्याशी झाला. लग्न झाल्यानंतर 2 वर्ष सासरच्यांनी दिपाली हिला चांगले नांदविले. यानंतर किरकोळ भांडणावरुन वाद उरकून काढत सासू व सासरे तिला मारहाण करायला सुरुवात केली. आई-वडीलांशी फोनवरुन बोलू दिल्या जात नव्हते. अशा प्रकारे माहेरी आई-वडीलांना याबाबत सांगितले. त्यांनी पती, सासरे व सासू यांची समजूत काढली. त्यानंतरही त्रास सुरुच होता. पुन्हा मेडीकल टाकायचे असून यासाठी दिपालीला माहेरुन 10 लाख रुपये घेवून अशी मागणी केली. न दिल्याने मानसिक त्रास देण्यास सुरुवात करुन मला माहेरी सोडून व सहा महिने उलटले तरी पुन्हा घ्यायला आले नाही. अखेर शारिरीक व मानसिक त्रास वाढल्याने दिपालीने शनिवारी रामानंद पोलीस ठाणे गाठले. फिर्यादीवरुन पती डॉ. गोविंदा भिका महाजन, सासरे भिका गुलाब महाजन, सासू मिना महाजन व दीर उदय महाजन यांच्याविरोधात गुुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धागेदोरे, बुवाबाजी, आयुर्वेदीक औषधींचे प्रयोग
लग्न झाले अन् सासू-सासर्यांकडून दिपालीला देवाचे धागेदोरे टाकल्याचा प्रयत्न होत होता. यानंतरही दिपालीने अघोरी शक्ती आणली असून ती त्याचा वापर पतीला वशमध्ये करण्यासाठी करत असल्याच्या कारणावरुन सासरे दिपालीला मालेगाव जिल्ह्यातील गाळणे येथील एका बाबाच्या मठात घेवून गेले. तसेच तु घरात आल्यापासून वाटोळे झाल्याचे वारंवार दिपालीला हिणवत असत. एवढ्यावरच सासरचे थांबले नाही तर गर्भधारणा होवू नये म्हणून पती,सासू व सासरे यांनी स्वतःच्या गुरुकृपा मेडीकलमधून आयुर्वेदीक औषधीचे काढे तयार करुन दिपालीला प्यायला दिले. त्यामुळे त्रास होवून दिवस न राहिल्याचे दिपालीने फिर्यादीत म्हटले आहे.