चेन्नई । महिला ट्वेंटी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताचा पराभव करणार्या इंग्लंड क्रिकेट संघातील एका अष्टपैलू महिला खेळाडूला विराट कोहलीने स्पेशल गिफ्ट दिले आहे. 26 वर्षीय या महिला क्रिकेटरने ट्विटरद्वारे विराटने गिफ्ट दिल्याची माहिती दिली.पुरूषांच्या ट्वेंटी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी भारताला अंतिम फेरीपर्यंत पोचविण्यात मोलाचा वाटा उचलणार्या विराट कोहलीला इंग्लंडची क्रिकेटर डॅनियल वेट हिने लग्नाची मागणी घातली होती.
कोहली माझ्याशी लग्न कर असा संदेश तिने ट्विटरवरून दिला होता. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या उपांत्य फेरीतील सामन्यानंतर डॅनिएलने हे ट्वीट केले होते. विराटने इंग्लंडची ऑलराउंडर डॅनी वेट हिला आपली बॅट गिफ्ट केली आहे. या आठवड्यातच सरावाला पुन्हा सुरुवात केली. विराट कोहलीचे आभार मानताना त्याने दिलेल्या बॅटचा वापर करण्यासाठी अजून वाट पाहू शकत नाही असं ट्विट करून तिने विराटने बॅट गिफ्ट दिल्याची माहिती दिली. आपल्या ट्विटमध्ये तिने बॅटचा उल्लेख करताना इंग्रजीत बिस्ट असा केला. म्हणजे ती बॅट आपल्या विरोधकांवर क्रूरपणे हल्ला करते असं तिने म्हटलं आहे. विराटने दिलेल्या बॅटचाही फोटो तिने सोबत शेअर केला असून या बॅटच्या खाली विराट कोहली असं नाव लिहिलं आहे. यापूर्वी ट्विटरवरून थेट लग्नाची मागणी घालणार्या डॅनियल वेटची विराटने भेट घेतली होती.