अहमदनगर – लग्नाचे अमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या तरुणाविरुध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सारसनगर येथे राहणाऱ्या एका तरुणीला लग्नाचे अमिष दाखवून राहुल साहेबराव बोरुडे (रा. बोरुडे कॉलनी, बुरुडगावरोड, भोसले आखाडा) याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुल याने स्वत:च्या राहत्या घरी व शिक्षण घेत असलेल्या पुणे येथील खराडी येथे अत्याचार केला. त्यानंतर आरोपी राहुल याने पिडीत मुलीला लग्न करत नाही काय करायचे ते कर असे म्हणून तिला धमकावले. याप्रकरणी संबधीत तरुणीने पोलीस ठाणे गाठून राहूल बोरुडे याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.