धुळे । शहरातील स्टेशनरोड भागात राहणार्या व्यापार्याच्या पुतणीला लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने पळवून नेल्याची तक्रार शहर पोलिसात नोंदविण्यात आली आहे.
धनाई पुनाई कॉलनी स्टेशन रोड,मागे धुळे येथे राहणार्या सुनिल बापू यादव (वय 42) या कापड दुकानदाराने शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार मंगळवार 8 रोजी सकाळी 7.00 वाजेच्या सुमारास मिलिंद राजेंद्र आवटे रा.रेल्वे स्टेशनरोड,धुळे याने फिर्यादीची पुतणी करिष्मा (नाव बदललेले आहे) वय 20 हिला लग्नाचे आमिष दाखवून सुनिल यादव यांच्या घरातुन पळवून नेले. भादंवि 366, 506 प्रमाणे शहर पेालिसांनी आरोपी आवटे विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. तपास पीएसआय राजेंद्र माळी करीत आहेत.