जळगाव । तालुक्यातील दापोरा येथील 19 वर्षीय तरुणीला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली. याप्रकरणी आज तालुका पोलिसात पिडीत तरुणीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे., दापोरा येथील 19 वर्षीय तरुणीला निलेश अनिल लिगाडे व त्याचा मित्र रवी (पूर्ण नाव माहिती नाही) या दोघांनी पिडीत तरुणीला शिरसोली रस्त्यावरील पुलाजवळ बोलवून तिला लग्नाचे अमिष दाखवून तिला धुळे येथे पळवून नेवून तिच्यावर दि.25 जुन रोजी जबरदस्तीने बलात्कार केला. दरम्यान आज पिडीत तरुणीच्या फिर्यादीवरून दोन्ही तरुणांविरुध्द तालुका पोलिसात भादवी कलम 363,366, 376, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास डीवायएसपी रशिद तडवी करीत आहे. दरम्यान पोलिसांनी निलेश लिगाडे याला अटक केली आहे.