लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार

0

येरवडा । लग्नाचे आमिष दाखवून सात वर्षे शारीरिक संबध ठेवून मुलीवर बलात्कार करण्याची धमकी देत अत्याचार करणार्‍याविरुद्ध येरवडा पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. येरवडा येथील पीडित महिलेच्या तक्रारीवरून इस्माईल मोहम्मद खान (वय 49, रा. नागपूरचाळ) याच्याविरुद्ध न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांशी असलेल्या हितसंबधामुळे या पोलिस मित्रावर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांनी विलंब केल्याचे पिडीत महिलेने पोलिस आयुक्तांना दिलेल्या लेखी तक्रारीत नमूद केले आहे.

सदर महिला येरवड्यात दोन मुलांसह राहते. सात वर्षांपूर्वी ओळखीतून इस्माइलने तिच्याशी जवळीक साधत लग्नाचे आमिष दाखवले. गैरफायदा घेऊन वेळोवेळी शारीरिक संबध प्रस्थापित केले. महिलेने लग्नासाठी तगादा लावला असता तिला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. 16 जूनला महिलेने यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज दाखल केला. त्यानुसार न्यायालयाने येरवडा पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

गुन्हा दाखल होताच आरोपी फरारी झाल्याचे महिलेने सांगितले. येरवडा पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक करावी अशी मागणी महिलेने केली आहे. अधिक तपास महिला पोलिस उपनिरीक्षक मनिषा टुले करीत आहेत.