ठाणे । व्हॉटसअॅपद्वारे अल्पवयीन मुलीशी मैत्री करून तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 25 वर्षीय तरुणाने लग्नाच्या आणाभाका दिल्या. त्यानंतर अंबरनाथमध्ये भाड्याने घेतलेल्या खोलीत आणून तिच्यावर बलात्कार केला. धक्कादायक बाब म्हणजे बलात्कारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. अमरराज डिसोजा (25) असे फरार आरोपीचे नाव आहे. पीडिता ही 17 वर्षीय 8 महिन्यांची असून, ती मुंबईतील कांदिवली परिसरात राहते. दादर परिसरात राहणार्या अमरराज या आरोपीने तिच्याशी व्हॉटसअॅपद्वारे पीडित तरुणीशी मैत्री केली. गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला आहे. याप्रकरणी पोलीस आरोपीचा कसोशीने शोध घेत आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चौहान करीत आहेत.
गरोदर राहिल्यामुळे घटना उघडकीस
त्यानंतर त्याने तिला लग्नाचे अमिष दाखविले. आरोपीने पीडितेला अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीत चिंचपाडा परिसरात घेतलेल्या भाड्याची खोलीवर नेऊन 2 ते 3 वेळा बलात्कार केला. हा गुन्हा सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीदरम्यान घडला. दरम्यान पीडित तरुणी गरोदर राहिल्याने हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पीडितेच्या आईने अंबरनाथ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.