Chalisgaon taluka girl pregnant after Rape : Crime Against Youth चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यातील एका खेडे गावातील अल्पवयीन तरुणीवर घरासमोरच राहणार्या तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून ओळख वाटत वारंवार अत्याचार केला व यातून पीडीता गर्भवती राहिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी राकेश युवराज जिरे (22, चाळीसगाव तालुका) यांच्याविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
लग्नाच्या आमिषाने वारंवार अत्याचार
चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील 16 वर्षीय पीडीता आपल्या आई वडील व भावासह वास्तव्यास आहे. पीडीतेच्या घरासमोर संशयीत आरोपी राकेश युवराज जिरे (22) हादेखील वास्तव्यास असून त्याने पीडीतेशी सलगी वाढवत तुला पसंत करतो, माझ्याशी लग्न कर म्हणत पीडीतेचा पाठलाग करून तिच्यावर सन 2021 ते एप्रिल 2022 दरम्यान वारंवार अत्याचार केला तसेच तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. या प्रकारातून पीडीता गर्भवती राहिली तसेच आरोपीने पीडीतेच्या आई-वडिलांना व भावाला जीवे ठार मारेल, अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. आरोपी राकेश युवराज जिरे (22) याच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्य निरीक्षक धरमसिंग सुंदरडे करीत आहेत.