लग्नाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार : सावदा रेल्वे स्टेशन प्रबंधकाविरोधात गुन्हा

Bhusawal girl raped for marriage : Crime against Sawda railway station manager भुसावळ : रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून नंतर ओळख वाढवून विवाह करेल, अशी बतावणी करून शहरातील 29 वर्षीय युवतीवर अत्याचार करण्यात आला मात्र नंतर विवाहाला नकार दिल्यानंतर सावदा येथील रेल्वे स्टेशन प्रबंधक अंकुश किरण मोरे (रा.गणेश कॉलनी, मरीमाता मंदीरामागे, भुसावळ) याच्याविरूध्द युवतीने दिलेल्या फियादीवरून अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

आधी वाढवली सलगी नंतर केला अत्याचार
31 मार्च 2018 या दिवशी सायंकाळी पाच वाजता लोणारी हॉलजवळ बोलावून तेथून त्याच्या घरी नेत आरोपीने अत्याचार केला व नंतर लग्नाबाबत विचारणा केली असता त्यास आरोपी मोरे याने नकार दिला. याबाबत युवतीने रविवारी शहर पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. तपास पोलिस उपनिरीक्षक अंबादास पाथरवट करीत आहे.