पिंपरी- लग्न जुळविणार्या संकेतस्थळावरून माहिती मिळवून एका तरूणीची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शिल्पा राजेंद्र पशीने (वय 29, रा. शंकर कलाटे नगर, वाकड) या तरुणीने फिर्याद दिली असून रुद्रा थापर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रुद्रा थापर याने शॉदी डॉट कॉम’ या संकेतस्थळावरुन शिल्पा या तरुणीची माहिती मिळवली. लग्न करण्यासाठी विश्वास संपादन केला. त्यांनतर मला आर्थिक अडचण असल्याचे सांगून शिल्पाच्या पेटीएम व सिटी बँकच्या क्रेडीट कार्डचा वापर करुन 2 लाख 94 हजार रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर आपला मोबाईल बंद केला. त्यानंतर शिल्पाला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.