लग्नाच्या आमिषाने महिलेवर बलात्कार

पारोळा : तालुक्यातील एका गावातील 27 वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवत पळवून नेत तिच्यावर अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी पारोळा पोलिस ठाण्यात तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पालघरसह भोईसरात अत्याचार
पारोळा तालुक्यातील एका गावात 27 वर्षीय महिला ही कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. दरम्यान गावातील संशयीत आरोपी मुकेश राहूल जाधव (25) याने महिलेला लग्नाचे आमिष दाखवत तिला पालघर येथील भोईसर येथे 17 मे रोजी पळवून नेले. तेथे नेवून तिच्यावर लग्नाचे आमिष दाखविले आणि तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार 28 मे पर्यंत सुरूच होता. त्यानंतर महिला ही आपल्या गावी आली. मंगळवार, 8 जून रोजी पोलिसात धाव घेवून तक्रार दिल्याने संशयीत आरोपी मुकेश राहुल जाधव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राजू जाधव करीत आहे.