लग्नाच्या आमिषाने विद्यार्थिनीवर अत्याचार  : संशयीत तरुणाला अटक

Abuse of minor student in Bhusawla: Accused arrested भुसावळ : शहरातील एका भागातील रहिवासी असलेल्या शाळकरी विद्यार्थिनीवर लग्नाच्या आमिषाने तरुणने वारंवार अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली असून या प्रकरणी तरुणाविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी भावेश योगेश तायडे (18, रा. 741 ईएफ, 7 नंबर पोलिस चौकीच्या मागे, भुसावळ) यास अटक करण्यात आली.

स्कूटीवर बसवून नेत केला अत्याचार
पीडीता शहरातील एका शाळेची विद्यार्थिनी असून संशयीत आरोपी भावेशने 23 जुलै 2022 रोजी शाळेच्या गेटवर पीडीतेची भेट घेत मला तुझ्याशी बोलायचे आहे, असे सांगून स्कूटीवर बसवत सात नंबर पोलिस चौकीच्या मागील पडीत रेल्वे क्वार्टरमधील रुममध्ये नेत मला तू खूप आवडतेस, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, असे सांगत तिच्यावर अत्याचार केला तसेच 19 ऑगस्ट 2022 रोजी पुन्हा शाळेच्या गेटवर बोलावून स्कुटीवरून जामनेर रोडवरील एका धार्मिक स्थळानजीक एका गार्डनमध्े तिच्याशी तु मला खुप आवडते म्हणत अंगलट केली तसेच गेल्या दोन महिन्यापासून तरुणाने पीडीतेचा पाठलाग करीत विनयभंग केला.

भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा
आरोपीने पीडीतेला तिचे घर सोडून त्याच्या घरी येण्यास सांगितल्यानंतर सोमवार, 10 ऑक्टोबर रोजी भल्यापहाटे साडेचार वाजता पीडीता पालकांच्या संमतीशिवाय घर सोडून संशयीत भावेश तायडे याच्याकडे गेली. याप्रकरणी पीडीत बालिकेने दिलेल्या फिर्यादीनुसार दिलेल्या फिर्यादीनुसार भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला भावेश तायडेविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. भावेश यास अटक करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक विलास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक प्रकाश वानखडे पुढील तपास करीत आहेत.