लग्नाच्या एक दिवसआधीपर्यंत प्रियांका करणार चित्रपटाचे शूटिंग

0

मुंबई : बॉलीवूडची देशी गर्ल प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास डिसेंबरमध्ये लग्नबेडीत अडकणार आहे. दोघानाच्या कुटुंबीयांची जोरात तयारी सुरु आहे. मात्र, प्रियांका लग्नाच्या एक दिवसआधीपर्यंत सुद्धा चित्रपटाचे शूटिंग करणार आहे.

प्रियांका ‘द स्काय इज पिंक’ चित्रपटाचे शूटिंग करणार आहे. ती लग्नाच्या आदल्या संध्याकाळपर्यंत सुद्धा चित्रपटाचे शूटिंग करणार आहे. सोनाली बोस दिग्दर्शित ‘द स्काय इज पिंक’ चित्रपटात अभिनेता फरहान अख्तर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या या चित्रपटाची शूटिंग दिल्लीमध्ये होत आहे.

दरम्यान, निक जोनास लग्नाची शॉपिंग करुन भारतात परतला आहे. याबाबतचा फोटोही प्रियांकाने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.