यावल शहरातील घटना ; चौघांविरुद्ध गुन्हा
यावल:- लग्नात जेवणाच्या पंगतीतून उठवल्याने झालेल्या वादात दोन महिलांसह तिघांना चौघांनी मारहाण केल्याची घटना शहरातील सुंदर नगरात रविवारी दुपारी घडली. या प्रकरणी चौघांविरूध्द दोन अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले. सुंदर नगरीत जीवन माळी यांच्याकडे लग्न होते त्या लग्नात वर्हांडी सोबत ललित किसन माळी आला होता तो पंगतीत जेवणास बसला मात्र महिलांची पंगत असत असल्याचे सांगत त्यास पंगतीतून उठवल्यावरून वाद झाला.
रवींद्र रामदास माळी, निलेश संजय माळी, राहुल चौधरी व प्रवीण रामदास चौधरी या चौघांनी ललित माळी यास मारहाण करीत असतानाच ललितची आई कौशल्याबाई किसन माळी या मधे आल्याने त्यांनाही चौघांनी मारहाण केली. जीव वाचवण्याकरीता ललित हा उज्वला जनार्दन चौधरी यांच्या घरात शिरला तेथे देखील या महिलेसदेखील चौघांनी मारहाण केली व घराची तोडफोड केल्याने दोघा महिलांच्या फिर्यादीवरून यावल पोलिसात दोन अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले.