शिरपूर । लग्न झाल्यानंतर अंगावरची हळद निघत नाही तोच विवाहित तरुणी पळून गेल्याची धक्कादायक घटना शिरपूर तालुक्यात घडली आहे. भाटपुरा ता.शिरपूर येथे राहणार्या यशवंत सोमा मोरे (वय 45) यांनी थाळनेर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची मुलगी मनिषा (वय 18) हीचे दि.18 मे रोजी देवळाली कॅम्प,चाळ नं.6,आनंदरोड नाशिक येथे बौध्द जाती रिवाजाने लग्न झाले होते.हळद फेडल्यानंतर मनिषा तिच्या माहेरी म्हणजेच भाटपुरा येथे आली. लग्नाच्या पाचव्या दिवशीच भाटपुराची तरुणी पळाली दि.15 रोजी ती घरातुन पळून गेली. याप्रकरणी थाळनेर पोलिसात यशवंत मोरे यांनी फिर्याद दिली असुन पुढील तपास हे.कॉ.डी.डी.कोळी करीत आहेत.
तिघांची दुकानात दारु तोडफोड-दगडफेक
येथील मांडळ चौफूलीवर असलेल्या एका दारु दुकानावर फूकट दारु मागणार्या तिघांनी धिंगाणा घातल्याचा प्रकार सोमवारी रात्री घडला. या तिघांनी केवळ दुकानात तोडफोडच केली नाही तर बाहेर येवून दुकानावर दगडफेक केल्याने पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मांडळ चौफुलीवर शिरपूर वाईन या नावाने दारु विक्रीचे दुकान असून सोमवारी रात्री 8.15 च्या सुमारास दिपक नाना माळी ऊर्फ छोटा मुन्न्या, मोहन माळी, विक्की चोपडा हे तिघे या दुकानात आले असता त्यांनी काऊंटरवरील विनोद मोहदास तोलाणी यांच्याकडे फुकट दारु मागितली. विनोद तोलाणी यांनी दारु देण्यास नकार देताच या तिघांनी दुकानात शिरुन काऊंटरवर तोडफोड केली. तसेच विनोद तोलाणी यांना धक्काबुक्की करीत शिवीगाळ केली. एवढ्यावरच या तिघांचे समाधान न झाल्याने त्यांनी बाहेर येवून दुकानावर दगडफेक देखील केली. याप्रकरणी विनोद तोलाणी यांनी रितसर शिरपूर पोलिसात तक्रार केली असून पोलिसांनी दिपक माळी, मोहन माळी, विक्की चोपडा या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरु आहे.