खालापूर : पुणे वाकण येथून मुंबई बाजूकडे जाणार्या वर्हाडाच्या खाजगी बसचा ब्रेक निकामी झाल्याने ती समोर जाणार्या कंटेनरला धडकली. या अपघातात ऐकून 19 लोक जखमी झाले असून पैकी 2 जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना एम.जी.एम. रुग्णालय कळंबोली येथे दाखल करण्यात आले असून महिलेवर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तर चालक गंभीर असल्याने त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. हा अपघात मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाटात असणार्या खोपोळी बायपास च्या काही अंतरावर गुरुवारी रात्री 9.30 वा. सुमारास घडला.
लग्नाचा वर्हाड घेवून जाणारी क्र. एम.एच. 04 एफ.के. 491 या बस चा ब्रेक निकामी झाल्याने ती बस समोर जाणार्या एम.एच. 46 4881 क्र. च्या कंटेनर वर जावून आदळल्याने अपघात झाला. किरकोळ जखमी वर्हाड्यांवर खोपोलीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचार करून सोडून देण्यात आले आहे. दुसरा अपघात माल वाहक ट्रक तामिळनाडू राज्यातून येत मुंबईस जात असताना ट्रक क्र. टी.एम.34 जे. 8716 या ट्रकचा ब्रेक निकामी झाल्याने हा ट्रक समोर जाणार्याट्रेलर ठोकत पुढे जावू लागला. ट्रक चालकाने जीव वाचविण्यासाठी चालत्या ट्रक मधून उडी मारल्याने त्याच ट्रकच्या चाकाखाली चिरडून ठार झाला. मात्र त्याचेही नाव समजू शकले नाही.