लग्नातील आतिषबाजीमुळे प्रियांका प्रचंड ट्रोल

0

मुंबई : प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. हा सोहळा अनेक कारणांनी चर्चेत राहिला. आता प्रियांका सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होतं आहे.

उमेदभवन येथे करण्यात आलेल्या आतिषबाजीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या फटाक्यांमुळे रविवारचा पूर्ण दिवस जोधपूरमध्ये हवेत प्रदूषणाची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे लोकांनी प्रियांकाला चांगलेच धारेवर धरले आहे.

प्रियंका ही ‘ब्रेथ फ्री’ या अस्थमाशी संबंधित कॅम्पेनची ब्रॅण्ड अॅम्बेसिडर आहे. यासाठी प्रियंका हिने प्रदूषण टाळण्य़ाचे आवाहन केले होते. मात्र, आपल्या विवाहसोहळ्यावेळी फटाक्यांची जोरदार अतिषबाजी केल्याने नेटकऱ्यांनी प्रियंकाला प्रचंड ट्रोल केले आहे. अनेकांनी प्रियंकाचा हा ढोंगीपणा असल्याचे म्हटले आहे.