नंदूरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील शेगवे येथील रहिवासी राहुल विजय राठोड हा तरुण मित्रांसोबत चिमणीपाडा येथे लग्नात नाचताना अचानक त्याला चक्कर आली आणि जमिनीवर कोसळला मित्रांनी त्याला लगेच उचललं आणि रुग्णालयात धाव घेतली परंतु राहुल या तरुणाने रस्त्यातच जीव सोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
लग्नात नाचताना अचानक चक्कर येऊन तरुण खाली कोसळून काही वेळातच दगावल्याने या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अत्यंत दुर्दैवी या घटनेमुळे शेगवे येथील राहुलच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राहुलच्या मित्रांनी देखील या घटनेबाबत दुःखद भावना व्यक्त केल्या आहे.