Harassment of married woman in Bhusawal : Crime against six people including husband भुसावळ : लग्नात मान-सन्मान केला नाही या कारणावरून शहरातील रहिवासी व चाळीसगाव येथील सासर असलेल्या विवाहितेचा मारहाण करून छळ करण्यात आला. या प्रकरणी पतीसह सहा जणांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
चाळीसगावातील पतीसह सहा जणांविरोधात गुन्हा
शाहिदा बी.सैय्यद इम्रान (19, काझी प्लॉट, पापा नगर, भुसावळ) या विवाहितेच्या तक्रारीनुसार, पती सैय्यद इम्रान सै.फकीरा, सासू नजमा बी. सैय्यद फकीरा, सासरे फकीरा सैय्यद मोहम्मद, दीर सैय्यद सादीक सैय्यद फकीरा, नणंद आयशा सैय्यद फकीरा, नणंद आफरीन सैय्यद अकीरा (सर्व रा.नगरपालिका, वाल्मीक नगर, चाळीसगाव) यांनी शिविगाळ करीत करीत धमकी देवून मारहाण करीत छळ केला. तपास नाईक अर्चना अहिरे करीत आहेत.