लग्नात हुंडा न दिल्याने विवाहितेच्या छळ : चौघांविरोधात गुन्हा

Harassment of Yawal’s Wife : Crime against four persons यावल : यावल शहरातील माहेर असलेल्या 19 वर्षीय विवाहितेस लग्नात तुझ्या वडिलांनी पैसे दिले नाही, असे सांगत पतीसह सासरच्या चौघांनी तिचा छळ केला. विवाहितेवर संशय घेत शारीरीक व मानसिक त्रास दिल्याप्रकरणी पतीसह चौघाविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

चौघांविरोधात गुन्हा दाखल
यावल शहरातील माहेर असलेल्या पूनम सागर नन्नवरे (19) या विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, पती सागर भगवान नन्नवरे, सासरे भगवान दगा नन्नवरे, सासू जनाबाई भगवान नन्नवरे व संदीप भगवान नन्नवरे (सर्व रा.रवंजे, ता.एरंडोल) या चौघांनी विवाहितेला तुझ्या वडिलांनी लग्नात पैसे दिले नाही, असे सतत बोलून तिला त्रास दिला व छळ केला तसेच तिच्यावर संशय घेत तिचा वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ केला. या प्रकरणी चौघांविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार सिकंदर तडवी करीत आहेत.