मुंबई : रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिम्बा’मध्ये रणवीर सिंह आणि सारा अली खान एकत्र दिसणार आहे. रिलीजच्या आधीच हा चित्रपट प्रचंड चर्चेत आहे. त्यामुळे ‘सिम्बा’च्या कलाकारांनी घेतलेली मेहनत ही पैसा वसूल ठरणार असं वाटत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
अजय देवगण पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसून येणार आहे. विशेष म्हणजे ‘सिंघम’ आणि ‘सिंघम २’ मध्ये पोलिसांच्या रुपात झळकलेला अजय या चित्रपटातही पोलिसांच्याच भूमिकेमध्ये दिसून येत आहे.
प्रदर्शित झालेला ट्रेलर पाहता या चित्रपटामध्ये मोठ्या प्रमाणावर अॅक्शन आणि कॉमेडी दृश्यांवर भर देण्यात आला आहे.