लग्नाला जाणारा भरवसच्या नवरदेवासह वर्‍हाडी जखमी

0

रत्नापिंप्री गावाजवळ दुभाजकावर वर्‍हाडाचे वाहन आदळले

पारोळा- अमळनेर तालुक्यातील भरवस येथील नवरदेवासह वर्‍हाडी पैठणकडे लग्नाला जात असताना भरधाव चारचाकी दुभाजकावर आदळल्याची घटना शनिवारी पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास रत्नापिंप्री गावाजवळ घडली. या अपघातात नवरदेवासह दहा वर्‍हाडी जखमी झाले. या अपघातात समाधान पाटील (भरवस, ता.अमळनेर) हा नवरदेव जखमी झाला असून त्याचे हात व पाय फ्रॅक्चर झाल्याने त्यास धुळे येथे उपचारार्थ हलवण्यात आले.

वर्‍हाडाचे वाहन दुभाजकावर आदळले
भरवस, ता.अमळनेर येथील वर्‍हाडी पैठण येथील लग्नास शनिवारी पहाटे निघाले असतानाच चारचाकी पारोळ्यापासून काही अंतरावर असलेल्या रत्नापिंप्री गावानजीकच्या दुभाजकावर आदळली. या अपघातात मनीषा दगडू पाटील (25) , संगीता सोनू पाटील (24), अश्विनी प्रविण सूर्यवंशी (16), हर्षदा कांतीलाल पाटील (16), पियुष दगडू पाटील (6), स्वप्निल साहेबराव पाटील (35), सिमु रविंद्र पाटील (30), दगडू साहेबराव पाटील (20), कविता समाधान पाटील (30), नंदिनी भास्कर देशमुख (60) हे जखमी झाले.