लग्नास नकार देणाऱ्या अल्पवयीन मुलीचे भररस्त्यात तरुणाने घेतले चुंबन

0

जळगाव : नंदूरबार येथून जळगावात आलेल्या तरुणाने लग्नास नकार दिला म्हणून अल्पवयीन तरुणीला जबरदस्तीने रस्त्यात अडवून मिठीत घेत चुंबन घेऊन मित्राला मोबाईलमध्ये या प्रसंगाचे फोटो काढायला लावल्याचा प्रकार सोमवारी मेहरुणच्या उद्यानात घडला. दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

सोमवारी दुपारी सागर हा नंदूरबार येथून एका मित्रासह जळगावात आला. मेहरुण उद्यानाकडे मुलीला अडवून काही अंतरावर घेऊन गेला व मिठीत घेत जबरदस्तीने चुंबन घेऊ लागला, त्यास मुलीने विरोध केला मात्र उपयोग झाला नाही तर दुसरा मित्र चुंबनाचे फोटो मोबाईलमध्ये काढत होता. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर मुलीच्या आई, वडीलांनी तेथे धाव घेत सागरच्या तावडीतून मुलीला सोडविले. याबाबत मंगळवारी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली.
याप्रकरणी दोघं तरुणांविरुध्द मंगळवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात विनयभंग व पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.