लग्न जुळत नसल्याने पालच्या युवकाची आत्महत्या

0

रावेर- लग्न जुळत नसल्याने तालुक्यातील पाल येथील 24 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली. याबाबत रावेर पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. देविदास मयाराम भील (24, पाल) असे मृत तरुणाचे नाव आहे. देविदास हा पाल येथे आई-वडिलांसह वास्तव्यास होता. गेल्या दोन वर्षांपासून त्याच्या लग्नासाठी स्थळ पाहण्याचे काम सुरू असलेतरी लग्न जुळत नसल्याने तो निराश झाला होता. या नैराश्यातून त्याने सातपुडा विकास महामंडळाच्या केळीच्या शेतात आंब्याच्या झाडाच्या फांदीस ओढणी बांधून गळफास घेतला. ही घटना दुपारी उघडकीस आली. याबाबत मयाराम उखा भील यांनी रावेर पोलिस स्थानकात खबर दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस उपनिरीक्षक अमृत पाटील, संजय जाधव, बाविस्कर करीत आहेत.