लग्न वर्‍हाडावर सर्जिकल स्ट्राइक, 40 जण ठार

0

येमेन । सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखाली फायटर विमानांनी हवाई हल्ला चढवला. या कारवाईत 20 नागरिक ठार झाले. स्थानिक रहिवासी आणि वैद्यकीय सूत्रांनी ही माहिती दिली. गावात विवाहसोहळा सुरू असताना अचानक हा हवाई हल्ला झाला. विवाहसोहळ्याला उपस्थित असणार्‍या वर्‍हाडी मंडळींना या हल्ल्यात आपले प्राण गमवावे लागले.

रुग्णालयात 40 मृतदेह आणण्यात आले. अनेकांच्या शरीराचे तुकडे झालेले होते. या हल्ल्यात 46 जण जखमी झाले असून यात 30 लहान मुलांचा समावेश आहे अशी माहिती अल जुमहोयुरी रुग्णालयाच्या प्रमुखांनी दिली. येमेनमधील हाऊथी बंडखोरांविरोधात सौदी अरेबियाचे मागच्या तीन वर्षांपासून युद्ध सुरू आहे.