लघुउद्योजकांनी लोखंडी मालाचे व्यवस्थापन कराव

0

चिखली : कुदळवाडी परिसरातील लघुउद्योजकांनी टाकाऊ लोखंडी मालाची विल्हेवाट लावताना योग्य व्यवस्थापन करावे, असे आवाहन प्रभाग स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी केले आहे. यादव व त्यांच्या कार्यकर्त्यांनी कुदळवाडी भागातील लघुउद्योजकांना प्रत्यक्ष भेटून त्यांना आवाहन करणारे निवेदन दिले.

कुदळवाडी परिसरात शेकडो लघु उद्योजक आहेत. ते प्रामुख्याने लोखंडी जॉब बनविण्याचे काम करतात. येथील लघु उद्योगांमधून अनेक टाकाऊ माल तयार होतो. त्यामध्ये लोखंडापासून तयार झालेल्या मालाचा अधिक समावेश असतो. हा टाकाऊ लोखंडी माल भंगार व्यावसायिकांना विकला जातो. या मालाची वाहतूक करताना कुदळवाडी भागातील सर्व रस्त्यांवर हा माल पडतो. त्यामुळे रस्त्यांवरून जाणारी वाहने पंक्चर होतात. तसेच नागरिकांनाही त्याचा त्रास होता, असेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी रोहित जगताप, आकाश साळुंखे, दिपक घन, अमित बालघरे, मनोज मोरे, नंदिप खरात, स्वप्निल पोटघन, किशोर लोंढे, स्वराज पिजंण, प्रशांत किवळे, करण पाखरे, यश जाधव, विशाल उमाप, अमोल रणसिंग आदी उपस्थित होते.