चिंचवड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑक्टोबर, 2017 मध्ये जाहीर केलेल्या योजनेनुसार पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या पुढाकाराने व केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्रालयातर्फे सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी ‘झेड सर्टिफिकेशन स्कीम’ शिबिर आयोजित केले आहे. शिबिर पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेच्या चिंचवड येथील कार्यालयात 15 ते 17 जानेवारी दरम्यान सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेपाच या वेळेत होणार आहे. शिबिरामध्ये क्वालिटी कंट्रोल ऑफ इंडिया ही संस्था देखील सहभागी होणार आहे. या शिबिराचा पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरातील लघु उद्योगांनी फायदा घ्यावा असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे व सचिव जयंत कड यांनी केले आहे.