कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये भाजप आमदार देबेंद्र नाथ रे यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. उत्तर दिनाजपूर येथील एका दुकानाच्या बाहेर लटकलेल्या अवस्थेत आमदार देवेंद्र नाथ रे यांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही हत्या असल्याचा आरोप करण्यात आला आहे. देबेंद्र नाथ रे हे हेमताबादचे आमदार आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी ही हत्या असल्याचे आरोप केले आहे. देबेंद्र नाथ रे यांच्या कुटुंबातील एका सदस्याने केलेल्या दाव्यानुसार, काही लोक मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घरी आले आणि त्यांना आपल्यासोबत घेऊन गेले. त्यामुळे त्यांची हत्या झाली असावी असे सांगत चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांनी ट्विट केले असून ममता बॅनर्जी सरकारवर टीका केली आहे.