लढाऊ विमान कोसळले; दोन पायलट ठार !

0

बंगळूर-बंगळुरूमध्ये लढाऊ विमान कोसळून दोन पायलटांचा मृत्यू झाला. नाव नेगी आणि अबरोल असे त्यांचे नाव आहे. येथील एचएएलच्या विमानतळावर आज शुक्रवारी सकाळी मिराज २००० हे लढाऊ विमान कोसळले. लढाऊ विमानामधील दोन्ही वैमानिक प्रशिक्षणार्थी होते.

हवाई दलाने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मिराज २००० हे विमान एचएएलद्वारे अद्ययावत असतानाही अपघात झाल्याने चौकशी करणार असल्याचे हवाई दलाने स्पष्ट केले. यामधील धक्कादायक बाब म्हणजे विमानाला आग लागल्यानंतर दोन्ही वैमानिकांनी पॅरॅशूटच्या साह्याने उडी मारली होती. मात्र, एक पायलट विमानाच्या अवशेषांवर पडल्याने जागीच मृत्यू पावला, तर दुसऱ्या पायलटचा उपचारावेळी मृत्यू झाला आहे.