लतादीदी, आशाताईंकडून भाजपचे अभिनंदन

0

मुंबई । उत्तर प्रदेशात भाजपच्या विजयाने गानसम्राज्ञी ‘भारतरत्न’ लता मंगेशकर आणि आशा भोसलेही आनंदित झाल्या आहेत. लतादीदींनी आणि आशाताईंनी खास ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदीसह भाजपच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे. यापूर्वीही लता मंगेशकरांनी पंतप्रधान मोदींना अनेकवेळा पाठिंबा दर्शवला होता. गायिका आशा भोसले यांनीही भाजपला अप्रत्यक्ष पाठिंबा दर्शवणारे ट्विट केले आहे.

पुढच्या निवडणुकीसाठीही सदिच्छा
‘भारतीय लोकशाहीचा भाग असल्याचा मला अभिमान आहे. पुढील लोकसभा निवडणुकीत कोणाची सत्ता येणार, हे ओळखणे आता फारसे कठीण नाही’ असे ट्वीट आशा भोसले यांनी केले.भाजपचे खासदार परेश रावल यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे अभिनंदन करताना म्हटले की, ‘राहुल गांधींच्या अनुपस्थितीतही काँग्रेसने पंजाबमध्ये विजय मिळवला. याबद्दल अमरिंदर सिंग यांचे अभिनंदन. अमरिंदर यांनी खर्‍या अर्थाने ‘कॅप्टन’ला साजेशी खेळी केली.’ कला क्षेत्रातील नामवंत ऐरवी राजकारण आणि राजकीय नेत्यांपूसन अलिप्त राहत असल्यातरी या दोन भगिनींनी भाजपला दिलेली उत्स्फुर्त दाद चर्चेचा मुद्दा ठरली आहे.