लपलेले दहशतवादी आता ‘रडार’द्वारे सापडणार

0

जम्मू-काश्मीर: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी घरोघरी लपून बसतात, त्यांना शोधणे अवघड जाते, त्यावर उपाय म्हणून आता काश्मिरातील लष्करी अधिकारी सर्च ऑपरेशनदरम्यान जिहादी आणि दहशतवाद्यांना पकडण्यासाठी नव्या रडार सिस्टिमचा वापर करणार आहेत, हे रडार घर आणि भिंतीच्या आरपार प्रवेश करण्यास सक्षम असणार आहे, अशी माहिती एका लष्करी अधिकार्‍याने दिली.

गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. घराघरांत लपून बसलेले दहशतवादी अचानकपणे जवानांवर हल्ले करत होते. मात्र, लपून बसलेल्या दहशतवाद्यांना शोधून काढण्यासाठी जवानांनी नवी युक्ती लढवली आहे. भारतीय लष्कर काश्मीरमधील घरात दडून बसलेल्या दहशतवाद्यांना बाहेर काढण्यासाठी रडार सिस्टिमचा वापर करणार आहे. हे रडार सिस्टिम अमेरिका आणि इस्रायल येथून मागवण्यात आले आहे. हे रडार सिस्टिम जवानांना दहशतवादी कुठे लपून बसले आहेत, हे सांगणार आहेत.