मुंबई: कांजूरमार्गच्या जागेवरून केंद्र आणि राज्य सरकार असा संघर्ष सुरु झाला आहे. आरे कारशेड कांजूरमार्गला हलविण्यात आले आहे. मात्र या जागेवर केंद्राने दावा केला आहे. ही जागा राज्य सरकारचे असल्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे. दरम्यान भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी कांजूरमार्गच्या जागेवरून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना थेट आव्हान दिले आहे. लपूनछपून मुलाखती देऊ नका, थेट समोर येऊन चर्चा करा असे आव्हान आशिष शेलार यांनी दिले आहे.
कांजुरमार्गची जागा केंद्र सरकारची आहे, त्यावर राज्य सरकार हक्क सांगत आहे. आरे कारशेड पूर्ण अभ्यास न करताच कांजूरमार्गला हलविण्यात आल्याची टीका शेलार यांनी केले आहे.