लपून छपून “दुकानदारी” करणाऱ्यांवर कारवाईसाठी अतिक्रमण विभागाचा दुकानाबाहेर 2 तास ठिय्या

जळगाव – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने संचार बंदी जाहीर केली आहे.राज्यातील सर्व संकुल बंद आहेत. अश्यावेळी सुद्धा शहरातील काही दुकानदार लपून छपून व्यवसाय करतात. अश्याच काही अवलिया दुकानदारांवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली.यावेळी चक्क हे दुकानदारांनी स्वतःला आपल्या ग्राहकांसह दुकानात कोंडून ठेवले होते. मात्र महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने चिकाटी दाखवत २ तास दुकाना बाहेर ठिय्या देत. त्या दुकानदारांवर कारवाई केली व त्यांची दुकाने सील केली. हे घटना काळकर मार्केट मधली असून यात ४ दुकानांचा समावेश आहे.

 

 

अतिक्रमण विभागाने