ललवाणी परीवाराने यशस्वी केली पालिताणा संघयात्रा

0

भुसावळ- श्री श्रावक संघाचे माजी कोषाध्यक्ष मदनलाल ललवाणी यांचा नातु व कोटेचा महिला महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य प्रा.डी.एम.ललवाणी यांचे ज्येष्ठ सुपूत्र सुयश ललवाणी व वर्षा ललवाणी यांनी जैन धर्मिय प्रसिध्द तीर्थक्षेत्र व श्रध्दास्थान पालिताना व पंचतीर्थ (पाच धार्मिक तिर्थ) अर्थात ‘ठाणा ते पालिताणा’ याचे यशस्वी आयोजन करून जवळपास 100 भक्तांना तिर्थयात्रा घडवली. पालिताना येथील पर्वतावर आदेश्वर भगवानाची भव्यदिव्य मूर्ती व मंदिर असूनप हे जागृत देवस्थान आहे. नवटुक व अनेक मंदिरे आहेत. दर्शनासाठी जवळपास चार हजार पायर्‍या पादाक्रांत कराव्या लागतात. कठीण असलेल्या या चढाई साठी वयस्कर व बालकांसाठी डोली वापरली जाते मात्र या तिर्थयात्रेची विशेष बाब म्हणजे आठ वर्षीय मनीत व 85 वर्षीय मदनलाल ललवाणी या दोहांनी डोलीचा सहारा न घेता हे अंतर पायीच पार केले. मदनलाल, दिलीपकुमार, सुयश, मनीत यांनी एकाच वेळी पायी चढुन दर्शनाचा लाभ घेतला. याप्रसंगी भक्ती संगीत, संघ पूजन आदी कार्यक्रम झाले. याच ठिकाणी परीवार अभिनंदन सोहळा करण्यात झाला.