शेंदुर्णी। येथील स्व.शेठ राजमल लखीचंद ललवाणी माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समितीला पाठींबा देत बेमुदत संपावर गेले आहे. मुंबईच्या आझाद मैदानावर 1 ऑगस्ट पासून समितीतर्फे न्याय हक्कासाठी आंदोलन सुरु आहे. मुल्यांकन पात्र उच्च माध्यमिक शाळांच्या याद्या घोषीत होऊन शंभर टक्के वेतन सुरु करावा व गेल्या 15 वर्षापासूनचा वेतनाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी शिक्षकांनी केली आहे. विद्यालयातील प्रा.डी.आर.पाटील, प्रा.व्ही.के.वाघ, प्रा.व्ही.एस.पाटील, प्रा.एस.एस.माळोदे, प्रा.अहेर, प्रा.पिंजारी आदींनी पाठींबा देत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. तसे निवेदन प्राचार्य, गटशिक्षणाधिकारी, तहसिलदार यांना पाठविण्यात आले आहे.