ललिता पंचमीनिमित्त 200 महिलांनी केले श्रीसूक्त पठण

0

चिंचवड : ललिता पंचमीनिमित्त पूर्णब्रह्म आणि अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पिंपरी-चिंचवड महिला आघाडीच्या वतीने सोमवारी श्रीसूक्त पठण व इतर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे 200 महिलांनी श्रीसूक्त पठण केले. निगडी येथील सावरकर भवनातील पूर्णब्रह्म सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.

यांची होती उपस्थिती
महासंघाचे आधारस्तंभ सतीश आचार्य, अध्यक्ष दिलीप कुलकर्णी, महिला अध्यक्षा माधुरी ओक, संजीवनी पांडे, उज्ज्वला केळकर, किरण लाखे, अनुपमा कुलकर्णी, अनुराधा कुलकर्णी, गोपाळ कळमकर, दिलीप गोसावी, अनंत कुलकर्णी, राजन बुडूख, पुष्कराज गोवर्धन, सुनील देशपांडे, अंतरा देशपांडे, शामकांत कुलकर्णी, सुहास पोफळे, महेश बारसावडे आदी उपस्थित होते. यावेळी सुमारे 250 महिलांनी दोन तास श्रीसूक्त पठण केले. महिलांनी भोंडला, जोगवा अशा पारंपरिक लोकसंस्कृती कार्यक्रमांबरोबरच विविध कलागुण सादर केले. सांस्कृतिक कार्यक्रमानंतर महालक्ष्मीची आरती व उपस्थितांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.