ललिता बाबरला ‘वुमन अ‍ॅचीव्हर’ पुरस्कार

0

मुंबई । अ‍ॅडव्होकेट्स असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियातर्फे आयोजित या कार्यक्रमात सातारा येथील ऑलिम्पिकपटू ललिता बाबर हिचा मुख्य न्यायूमर्तींच्या हस्ते ‘वुमन अचीव्हर’ पुरस्कार देऊन सन्मानही करण्यात आले.यावेळी मुख्य न्यायमूर्ती मंजुला चेल्लुर म्हणाल्या की,पालकांनी आपल्या मुलाच्या संगोपन वेळी मुलगा व मुलगी असा भेदभाव करू नये.मुलीमध्ये न्यूनगंड निर्माण होण्यास सुरवात येथूनच होते.ज्या देवाने मुलगा व मुलगी याच्या शारीरिक रचना वगळता कोणताही फरक केलेला नाही.त्यामध्ये तुम्ही आम्ही फरक केल्यामुळे न्यूनगंड निर्माण होतो. मुलीच्या मनात कोणताही न्यूनगंड नसेल आणि प्रबळ इच्छाशक्ती असेलतर क्षेत्रात तिला यश मिळू शकते.

पुरुषाप्रमाणे वागलो तरच यश मिळते, अशी गैरसमजूत काही महिलांची असते. तसे करू नका. कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्याच्या प्रक्रियेत अनवधानाने ‘पुरुष’ बनू नका. यश त्याच्यावर अवलंबून नसते. स्वतःच्या हिमतीवर व मेहनतीवर विश्वास ठेवा आणि यश मिळवण्यापासून मला कोणीच रोखू शकत नाही, असा आत्मविश्वास बाळगून मार्गक्रमण करत रहा. तुम्हाला यश नक्की मिळेल, असा सल्ला मुख्य न्यायमूर्ती मंजुला चेल्लुर यांनी जागतिक महिला दिनानिमित्त उच्च न्यायालय इमारतीत आयोजित कार्यक्रमात दिला. या कार्यक्रमाला न्यायमूर्ती आर. पी. सोंदुरबलदोटा, न्या. अनुजा प्रभुदेसाई, न्या. मृदुला भाटकर, न्या. साधना जाधव व न्या. शालिनी फणसाळकर-जोशी न्या. प्रभुदेसाई यांनी मराठी-इंग्रजी कवितांच्या माध्यमातून महिला दिनानिमित्त आपले भाव व्यक्त केले.