खापर: अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथील 500 गरजू कुटुंबांना पंचायत समितीचे माजी उपसभापती सुरेश जैन यांच्या प्रेरणेने माजी उपसरपंच ललित जाट व भूषण जैन यांच्याकडून जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले. कोरोना वायरसचा प्रादुर्भाव वाढु नये म्हणून शासनाने गेल्या 22 मार्चपासून लॉकडाउन जाहीर केले आहे. दीर्घकाळ लॉकडाउन असल्यामुळे अनेकांच्या रोजगारावर परिणाम झाला आहे. शासनाकडून रेशनकार्ड धारक नागरिकांना धान्य देण्यात आले असले तरी अनेक गरजू लोकांचे रेशन कार्ड अद्याप ऑनलाइन झाले नसल्याने शासनाकडून मिळणाऱ्या लाभापासून त्यांना वंचित रहावे लागत आहे. असे आणि इतर गरजू नागरिकांची निवड करुन 500 कुटुंबांना किराणा सामान वितरीत करण्याचे नियोजन ललित जाट यांनी केले.
शेतमजुर, कामगार, ग्रामपंचायतीचे कर्मचारी अश्या गरजूंची निवड करुन पाचशे कुटुंबांपर्यंत साहित्य पुरविण्यात आले असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच साहित्य महाराष्ट्र शासनाच्या प्लास्टिक बंदी कायद्याचे पालन करीत कापड़ी पिशवीत टाकून घरोघरी वितरित केले आहे. यावेळी किशन वसावे, किरण वसावे, श्याम लोहार, रमेश बोथरा, संजय चोपडा, तिलोक भूतड़ा,महेश पाडवी यांचे सहकार्य लाभले असल्याचे ललित जाट यांनी सांगितले.
Prev Post