लवकरच त्र्यंबकेश्‍वराचे ऑनलाइन दर्शन

0

नाशिक । नाशिक येथील त्र्यंबकेश्‍वराचे दर्शन आता लवकरच ऑनलाईन घेता येणार आहे. देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी त्र्यंबकेश्‍वर हे एक देवस्थान आहे. अन्य देवस्थानांप्रमाणेच या मंदिरातही ऑनलाईन दर्शनाची सुविधा सुरू केली जाणार असल्याने परदेशातील नागिरकांनाही घरबसल्या त्र्यंबकेश्‍वराचे दर्शन मिळणार आहे. तसेच शिवप्रसाद निवासी खोल्यांचेही ऑनलाईन बुकिंग करता येईल. त्याचबरोबर देणगीसाठीही ऑनलाईन बँकिंगचीही सुविधा देण्यात येणार आहे. त्र्यंबकेश्‍वराचे दर्शन घेण्यासाठी सध्या दर्शन पावती 200 रुपयांची आहे. या पावतीद्वारे उत्तर दरवाजातून थेट दर्शन घेता येते.

रूम बुकिंग सुविधा
त्र्यंबकेश्‍वराच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना राहण्याची कायमच चिंता असते. मात्र, आता ही चिंताही मिटणार आहे. कारण शिवप्रसादातील निवासी खोल्यांचेही ऑनलाईन बुकिंग करता येणार आहे. या खोल्यांचे दर 250 ते 1800 रुपये एवढे आहेत. आता ऑनलाईन दर्शनाच्या सुविधेमुळे आणखी सोपे होणार आहे.

तासन्तास रांगेत उभे राहण्याचा त्रास संपला
त्र्यंबकेश्‍वराच्या दर्शनसाठी भाविक चार-चार तास रांगेत उभे राहतात. मात्र, गाभार्‍यात गेल्यानंतर अगदी काही सेकंदच दर्शन घेण्यासाठी मिळतात. त्यामुळे अनेकजण नाराज होतात. हे सारे लक्षात घेऊन देवस्थान ट्रस्टने वेबसाईट अपग्रेड करून ऑनलाईन दर्शनाची सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.