लवकरच दबंग गर्ल अडकणार लग्नबेडीत; स्वत: दिले संकेत

0

हैदराबाद: जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या वादळी खेळीनंतर मोहम्मद नबीच्या फिरकीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा दारूण पराभव झाला. बंगळुरू संघाला सलग तिसऱ्या सामन्यात पराभवाचे तोंड पाहावे लागले. या लाजीरवाण्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून विराट कोहलीने कर्णधारपद सोडले. बेअरस्टो आणि वॉर्नर या दोघांनी शतकी खेळी करून सनरायझर्स हैदराबादला २० षटकांत 2 बाद २३१ धावांचा डोंगर उभा करून दिला. प्रत्युत्तरात बंगळुरुचा संपूर्ण संघ ११३ धावांवर माघारी परतला. हैदराबादने हा सामना ११८ धावांनी जिंकला. नवी दिल्ली-सध्या लग्नसराईची धूमधाम सुरु आहे. मनोरंजन क्षेत्रात देखील लग्नसराई सुरु आहे. अनेक सेलिब्रिटींचे शुभमंगल पार पडले आहे. येत्या काही दिवसांत दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा लग्नबेडीत अडकणार आहे. खुद्द सोनाक्षी सिन्हानेच तिच्या लग्नाचे संकेत दिले आहेत. ‘कलंक’ सिनेमाच्या प्रमोशनसाठी नुकतेच आलिया, वरूण आणि सोनाक्षी सिन्हाने ‘सुपर डान्सर चैप्टर 3’ हजेरी लावली होती. यावेळी कलाकारांनी त्याच्याशी निगडीत सगळे सिक्रेट सांगत स्पर्धकांचे खूप मनोरंजन केले. अशातच सोनाक्षी सिन्हानेही एक गुगली टाकत सा-यांनाच आश्चर्यचकीत करून सोडले. सोनाक्षी सिन्हाची ही गोष्ट ऐकताच खुद्द वरूण आणि आलियाही संभ्रमात पडले होते. त्याचे झाले असे की, या शोची जज शिल्पा शेट्टीने तिघांना प्रश्न केला की, कोणाचे लवकर लग्न होणार, त्यावर सोनाक्षीने आलिया आणि वरूण आधी माझे लग्न होणार असे सांगितले.

जज शिल्पा शेट्टीही सोनाक्षीचे लग्नाबाबत उत्तर ऐकून आश्चर्यचकीत झाली आणि तिला वाटले की, खरोखरच सोनाक्षी लग्नबंधनात अडकणार की काय, म्हणून शिल्पाने आणखीन खोलात जावून तिला लग्नाबाबत प्रश्न विचारायला सुरूवात केली.बिनधास्त आणि परखडपणे सोनाक्षीही कुठेही न अडखळता आपले उत्तर देत राहिली. त्यामुळेच सोनाक्षीलाही लग्नाचे वेध लागले असल्याची चर्चा रंगत आहे. याचवर्षी सोनाक्षी लग्नबंधनात अडकत आपल्या आयुष्याची नवीन सुरूवात करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. एरव्ही सोनाक्षीने लग्नाविषयी कोणत्याही प्रकारची कमेंट दिली नव्हती. पहिल्यांदाच ऑनस्क्रीन लग्नाबाबत सोनाक्षीने दिलेल्या प्रतिक्रीयेमुळे तिच्या लग्नाविषयी कुतूहुल चाहत्यांमध्ये वाढत असून सनई चौघडे कधी वाजणार याची उत्सुकता असणार हे मात्र नक्की.

तसेच तसेच एका मुलाखतीतही, मी ज्या व्यक्तीसोबत लग्न करेल त्याने मला पूर्णपणे स्पेस द्यायला हवा. मला बंधनात न ठेवता स्वतंत्रपणे जगण्याची मुभा दिली पाहिजे. लग्नाबद्दल बोलले तर, तुम्ही कोणत्याही व्यक्तीसोबत लग्न करा मात्र, चूकीच्या माणसासोबत आयुष्य घालवू नका असेही सांगायला ती विसरली नाही.