पाचोरा। पाचोरा रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळणे, रेल्वे स्थानकावर विस्तारीत प्लटफार्मवर शेड तयार करणे, इलेक्ट्रॉनिक कोच पोझिशन डिस्प्ले या समस्या आणि भुसावळ – पुणे हुतात्मा एक्सप्रेसला दोन स्लिपर कोच जोडणे यासाठी संसदेच्या 8 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट या अधिवेशन काळात भारतीय जनता पार्टीचे व ट्रेन लाईव्ह पोझिशन प्रवासी संघटनेच्या पदाधिकार्यांच्या शिष्टमंडळाने खासदार ए.टी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली रेल्वेमंत्री ना. सुरेश प्रभु, रेल्वे बोर्डाचे चेअरमन ए.के.मित्तल व रेल्वे बोर्ड ट्रफीक मेंबर यादगार यांची भेट घेवुन समस्या मांडल्या.
केंद्रीय रेल्वेमंत्री यांना दिले समस्याचे निवेदन
केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांच्याशी खासदार ए.टी.पाटील यांनी भाजपाचे पदाधिकारी व ट्रेन लाईव्ह पोझिशन प्रवाशी संघटनेच्या पदाधिकार्यांना सोबत घेवून पाचोरा रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या मागण्या व समस्यांचे निवेदन दिले. यावेळी रेल्वेमंत्री यांनी पदाधिकारी व संघटनेच्या सदस्यांना सकारात्मक प्रतिसाद देवुन लवकरच समस्या सोडविण्याचे आश्वासन दिल्याची माहीती भाजपाचे जिल्हासरचिटणीस सदाशिव पाटील यांनी प्रेसनोट द्वारे प्रसिध्दीसाठी दिली. यावेळी पाचोरा पंचायत समितीचे सभापती तथा तालुका अध्यक्ष सुभाष पाटील, शहराध्यक्ष नंदु सोमवंशी, सरचिटणीस बन्सीलाल पाटील, प्रदिप पाटील, जि.प.सदस्य डि.एम. पाटील, भाजपा युवा मोर्चाचे गोविंद शेलार, न.पा.गटनेते अमोल शिंदे, ट्रेन लाईव्ह प्रवासी संघटनेचे अध्यक्ष दिलीप पाटील, जितू नागराने, सौरभ पाटील, परेश पाटील, शुभम पाटील, पवन पाटील, सागर पाटील शिष्टमंडळात असल्याचे सांगितले.