नगरसेवक रामचंद्र जाधव मित्र मंडळाचा उपक्रम : त्वचारोग तपासणी व निदान शिबिरात घोषणा
चाळीसगाव (प्रतिनीधी)- गेल्या चार वर्षापासून राजेश्वरीच्या स्मरणार्थ रामचंद्र जाधव मित्र परिवार व जाधव परिवार यांचे कार्य समाजाला दिशा देणारे आहे. दिव्यागांची समस्या ही आपली समजून आपण समाजाचे देणेकरी लागतो. ही भावनाच मुळात आदर्श आहे. या भावना वास्तवात उतरवण्यासाठी चाळीसगाव शहरात ऐतीहासीक लायब्ररी उभारण्याचा मानस रोटरीचे माजी सहाय्यक प्रांतपाल तथा एज्युकेशन सोसायटीचे संचालक डॉ.सुनील राजपूत यांनी येथे व्यक्त केला. त्या लायब्ररीचे नाव राजेश्वरी जाधव फिजीकल हॅन्डीकॅप लायब्ररी असून त्यासाठी मित्र मंडळीच्या माध्यमातुन घोषणा करताच युगधंरा फाउंडेशनच्या स्मिता बच्छाव, पत्रकार किसनराव जोर्वेकर, उपनगराध्यक्ष शाम देशमुख यांनी प्रत्येकी पाच हजार रुपयांची घोषणा केली. एकामागून एक दात्यांनी देणगी दिल्याने सुमारे 51 हजार रूपये जमा होवून खर्या अर्थान लायब्ररीचा शुभारंभ होवून राजेश्वरी जाधव हिच्या चतुर्थ स्मृतीदीन संकल्प मित्र मंडळने केला आहे.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
अध्यक्षस्थानी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रदीप देशमुख, माजी आमदार राजीव देशमुख, प्रांताधिकारी शरद पवार, तहसीलदार कैलास देवरे, डी.वाय.एस.पी.नजीर शेख, पोलीस निरीक्षक रामेश्वर गाढे पाटील, सहाय्यक धर्मदाय आयुक्त, सी.यू.तेलगांवकर, डॉ.राहुलजी शिंदे, डॉ.अभिषेकजी पाटील, डॉ.धर्मराज राजपूत, डॉ.भूषण राजपूत, डॉ.प्रमोद औस्तवाल, डॉ.चेतन साळुंखे, डॉ.विद्या मोरे, डॉ.मनोज भोसले, मुख्याधिकारी अनिकेत मनोरकर, प्राचार्य बाळासाहेब चव्हाण, डॉ.बी.पी.बाविस्कर, डॉ.नरेंद्र राजपूत, डॉ.संदीप देशमुख, रामचंद्र जाधव, स्मिता बच्छाव, नगराध्यक्षा आशा चव्हाण, मीनाक्षी निकम, डॉ.उज्वला देवरे, हेमांगी पूर्णपात्रे, सायली जाधव, राजूअन्ना चौधरी, घुष्नेश्वर पाटील, आगारप्रमुख संदीपजी निकम आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
जाधव परीवाराचे कार्य अभिमानास्पद -शशीकांत साळुंखे
त्वचारोग निदान शिबिराचा लाभ 353 बालकांनी घेतला. त्यांना औषधोपचारासह भावी काळात लागणारे सर्व मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी राजीव देशमुख, प्रांतधिकारी शरद पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी नजीर शेख, युगंधराच्या स्मिता बच्छाव, दलित हक्क समितीचे धर्मभूषण बागुल, कवी रमेश पोतदार, ज्येष्ठ पत्रकार किसनराव जोर्वेकर, जिल्हा परीषद सदस्य शशिकांत साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले. त्यात त्यांनी दु:खातही सामाजिक दायीत्व स्वीकारुन जाधव परीवाराचे कार्य अभिमानास्पद आहे, असे विचार वक्त केलेत. कार्यक्रमाचे प्रास्तविक रामचंद्र जाधव यांनी केले तर प्रोजेक्ट चेअरमन डॉ.सुनील राजपूत यांनी कार्यक्रमाचा हेतू विषद केला.
यांनी घेतले परीश्रम
शिबिर यशस्वीतेसाठी श्यामभाऊ देशमुख, प्रमोद पाटील, भगवान पाटील, दीपक पाटील, डॉ.प्रमोद सोनवणे, जगदीश चौधरी, महेंद्र पाटील, संभाजी ब्रिग्रेडचे योगेश पाटील, रोशन जाधव, गौतम जाधव, संभाअप्पा जाधव, स्वप्निल कोतकर, किरणभाऊ जाधव, जितेंद्र जाधव, संदीप जाधव, संतोष पोळ, मयूर बागुल, राहुल जाधव, विकास जाधव, केशव निकम, समाधान अहिरे, प्रकाश मोरे, सुमित सोनवणे, अरुण जाधव, किरण पगारे, संदीप चव्हाण, राहुल जाधव, प्रतीक पाटील, भूषण खलाणे, सौरभ त्रिभुवन, शिवसागर पाटील, यज्ञेश बाविस्कर, निखील सोनजे, सुरज साळुंखे आदीनी सहकार्य केले. कार्यक्रमचे सूत्रसंचालन डॉ.संतोष मालपुरे यांनी केले तर आभार प्रवीण जाधव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रामचंद्र जाधव मित्र मंडळाने सहकार्य केले.