लवकरच शहरातील वळण रस्त्यांचाही प्रश्‍न मार्गी लागणार

0

अमळनेर । एरंडोल, अमळनेर, नंदुरबार राष्ट्रीय महामार्गाचा प्रश्‍न मार्गी लागला असताना या कामासोबतच शहरातील वळण रस्त्यांचाही प्रश्‍न मार्गी लागणार असून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामास मंजुरी मिळून निधीची तरतूद होईल, असे आमदार शिरीष चौधरी यांनी लेखी पत्रद्वारे केली आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली असता मंजुरींसाठी प्राथमिक चर्चा झाली यावेळी त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन अधिवेशनात मंजुरीचे संकेत दिले आहे. वळण रस्त्यांसाठी चार टप्पे प्रस्तावित असून सुरवातीला या अधिवेशनात दोन टप्प्याना मंजुरी मिळविणार आहे. कार्यकाल संपेपर्यंत चारही टप्पे पूर्ण झालेले असतील, असा असा मनोदय आमदार चौधरी यांनी व्यक्त केला आहे.

असे आहेत वळण रस्त्याचे टप्पे
पहिला टप्पा – धुळे, अमळनेर, चोपडा राष्ट्रीय मार्ग 15 वर विज कंपनी सबस्टेशन मागून प्राजीमा 50 फाफोरे बहादरपूर रोडला जोडून हा मार्ग बहादरवाडी गावाजवळ 48 पारोळा रस्त्यावर येऊन ठेपणार आहे. दुसरा टप्पा – बहादरवाडी गावापासून ते प्रजिमा 49 अमळनेर, ढेकू, जांभोरा रस्ता, अमळनेर, चोपडा रस्त्यावर देवळी गावाजवळ पोहोचणार आहे. तिसरा टप्पा – धुळे, अमळनेर, चोपडा राष्ट्रीय मार्ग 15 वर वीज पारेषण कंपनी सबस्टेशन ते अमळनेर मांडळ प्र.जि.मा. 51 वर येणार आहे. चौथा टप्पा – अमळनेर मांडळ रस्ता ते राष्ट्रीय मार्ग 6 अमळनेर शिंदखेडा रस्त्यावर गलवाडे गावाजवळ निघणार आहे,अमळनेर ते गलवाडे रस्ता पोलीस ठाण्यापासून जाणारा आहे, चोपडा, पारोळा, धरणगाव व दोंडाईचा कडे जाण्यासाठी शहरातूनच जावे लागते. दगडी दरवाज्याजवळ अवजड व छोट्या वाहनांची कोंडी होते याला पर्याय म्हणून हा 11.70 किमी लांबीचा वळण रस्ता सुकर ठरणार असल्याने आ शिरीष चौधरी यांनी जातीने लक्ष घातले आहे. विशेष म्हणजे हा रस्ता पारोळा, जळगाव, चोपडा, पारोळा, दोंडाईचाकडे जाणार्‍या मालवाहतूक व छोट्या वाहनांना अतिशय सोयीचा ठरणार आहे.