नवी दिल्ली: देशात लवकरच १५० खासगी रेल्वे धावणार असून, अर्थ मंत्रालयाने १९ रोजी अप्रेजल कमिटी कडून दाखल करण्यात आलेल्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या मंजुरीमुळे खासगी रेल्वे धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. १०० रेल्वेमार्गावर १५० रेल्वे धावणार आहे. यासाठी लांब यासाठी लांब पल्ल्याच्या गाड्यांची निवड करण्यात आल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. या मार्गांसाठी पुढील महिन्यांपासून खासगी कंपन्या बोली लावण्याची शक्यता वर्तवली आहे. रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने एका इंग्रजी वृत्तपत्राला माहिती दिली.
मुंबई-कोलकाता, मुंबई-चेन्नई, नवी दिल्ली-मुंबई, तिरुवनंतपूरम-गुवाहाटी, नवी दिल्ली-कोलकाता, नवी दिल्ली-बेंगळुरू, नवी दिल्ली-चेन्नई, कोलकाता-चेन्नई. चेन्नई-जोधपूर या मार्गांचा समावेश आहे. तसेच, या प्रमुख मार्गांपैकी मुंबई-वाराणसी, मुंबई-लखनऊ, मुंबई-नागपूर, नागपूर-पुणे, सिंकदराबाद-विशाखापट्टणम, पाटणा-बेंगळुरू, पुणे-पाटणा, चेन्नई-कोईबंतूर, चेन्नई-सिंकदराबाद, सूरत-वाराणसी, भुवनेश्वर-कोलकाताचा समावेश आहे.
नवी दिल्ली हून पाटणा, अलाहाबाद, अमृतसर, चंदीगड, कटरा, गोरखपूर, छपरा व भागलपूरचा समावेश आहे. १०० मार्गापैकी नवी दिल्लीहून ३५, मुंबईतून २६, कोलकाताहून १२, चेन्नईहून ११ आणि बेंगळूरूहून ८ मार्ग कनेक्ट होणार आहेत. हे सर्व शहर महानगर आहेत. अन्य काही महानगर नसलेल्या शहरातही हे रेल्वेमार्ग जोडण्याचा विचार सुरू आहे. यात गोरखपूर-लखनऊ, कोटा-जयपूर, चंदीगड-लखनऊ, विशाखापट्टणम-तिरुपती आणि नागपूर-पुणे या शहराचा समावेश आहे. खासगी रेल्वेच्या मार्गासाठी पाहणी करणे सुरू आहे. खासगी कंपन्यांना बोली लावण्यासाठीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. भारतीय रेल्वेसाठी हा मैलाचा दगड असणार आहे, असे रेल्वे बोर्डाचे चेअरमन विनोद कुमार यादव यांनी सांगितले आहे.