लवथळेश्वर कुंडाचा जीर्णोद्धार

0

जेजुरी । स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत श्रीक्षेत्र जेजुरी येथील लवथळेश्वर कुंडाच्या जीर्णोद्धारास प्रारंभ करण्यात आला आहे. अनुलोम संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल वझे यांच्या हस्ते या कामास सुरुवात झाली. हे काम अनुलोम संस्था व समुत्कर्ष प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येत आहे. यावेळी अनुलोमचे विभाग प्रमुख अनिल मोहिते, उपविभाग प्रमुख शैलेंद्र ठकार, भाजप नेत्या संगीताराजे निंबाळकर, तालुकाध्यक्ष सचिन लंबाते, शहराध्यक्ष अशोक खोमणे, अनुलोमचे पुरंदरचे प्रमुख सागर गोडसे, रा. स्व. संघाचे किरण बारभाई, समुत्कर्ष प्रतिष्ठानचे अक्षय गोसावी, राजाभाऊ चौधरी आदी उपस्थित होते. पौराणिक कथेनुसार लवथळेश्वर मंदिर प्राचीन असून येथे शेकडो भाविक दर्शनाला येतात. लवथळेश्वर मंदिर परिसरातील कुंड प्रसिद्ध असून, हे एक पवित्र तीर्थ मानले जाते. या कुंडाच्या जीर्णोद्धारामुळे मंदिराच्या वैभवात अधिक भर पडणार आहे.